भावनांशी खेळणार्या या जगात मी जगलोच नाही
आयुष्यातले प्रेम मी कधी जगलोच नाही
खुप पाहीले सख्खे म्हणवणारे
पण सच्च्या दिलदाराला आजवर कधी भेटलोच नाही
‘येतील बहु होतील बहु पण या सम हीच’
या उक्तीला साजेशी कुणी भेटलीच नाही
हृदय हेलावणारे प्रेम करणारी दिसलीच नाही
आयुष्यातले प्रेम मी कधी जगलोच नाही
करत बसलो पाहुणचार त्या रम्य आठवणींचा
भेटेलशी वाटेल अशा निसटत्या क्षणांचा
आळवून हाक मारुनही कुणी फिरकलीच नाही
आयुष्यातले प्रेम मी कधी जगलोच नाही
काय सांगु व्यथा या अर्थहीन जगण्याची
कोनाड्यात पडलेल्या जशा जुनाट वस्तुची
जळमटे ती कधी तोडू शकलोच नाही
आयुष्यातले प्रेम मी कधी जगलोच नाही
येईल एक दिवस माझ्याही आयुष्यात
भेटेल ती मज अन घेईल बाहुपाशात
हसून सांगेन मग तिला मी,
खरंच,
आयुष्यातले असं प्रेम मी कधी जगलोच नाही...
2 comments:
mast lihaliye kavita .... awesome
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे, पण ही कविता मी स्वत: लिहली नाहीये..... कुठेतरी छानशी वाचलेली.
Post a Comment