कधी तू पण माझी वाट पहावी अशी माझी नेहमी इच्छा असायची
पण तू येण्याच्या आनंदाने मी इतकी बावरून जायचे कि तुझ्या आधी तिथे असायची
जसे मला नेहमी वाटते तसे तुला कधी वाटेन का?
कधी माझी वाट माझ्या आधी तुही पाहशील का?
...
तू लाख प्रयत्न कर तुला जमणारच नाही
जिवंत पणेच काय पण मृत्यूनंतर पण मी हि संधी तुला देणारच नाही...
No comments:
Post a Comment