कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Tuesday, November 22, 2011

काहीं चारोळया


एकांतात भेटलो दोघे
तिही निस्तब्ध मीही निस्तब्ध
भांडण चालले मुके मुके
कोण बोलेल पहिला शब्द....


सावलीच्या व माझ्या शर्यतीत
सावली नेहमीच पुढे असते
मला जिंकल्याचा आभास होऊन
मन माझे नेहमीच फ़सते


स्वप्नातील पावलांना
चालणे कधी कळलेच नाही;
पाऊलवाट चांगली असली तरी
पाऊल हे वळलेच नाही..........



इतक प्रेम करतो मी तीच्यावर का ती दररोज मला विचारते की मी कीती प्रेम करतो ते
सर्व गोष्टी बोलुनच व्यक्त होतात का?
माझ्या प्रेमाला कुणाची नजर लागु नये म्हणुनच आज पर्यँत तुला PROPOSE केल नाही...



प्रेमही केल खर खूप
झालाही त्रास आठवणींचा खूप
जेंव्हा गेली ती प्रिय सखी
मांडून या हृदयाच्या खोलीत
आठवणींचे हजारो धूप


मरण दाराशी आल तेव्हा
त्याला एक सांगायच होतं
माझ जगुन झालय आता
तिच्यासाठी जगायच होतं


No comments: