कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Tuesday, November 8, 2011

वयानुसार मुलाचे प्रेम आणि त्या प्रेमावरील मुलीच्या नाजूक भावना






५ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, मी हळूच रोज त्याच्या दप्तरातील चोकलेट काढणे पण तरी त्याचे नेहमी तिथेच चोकलेट ठेवणे. ♥


१० वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, एकत्र अभ्यास करताना पेन्सिल घ्यायच्या बहाण्याने मुद्दामहून त्याने माझ्या हाताला केलेला स्पर्श. ♥


१५ वर्षाची मुलगी ...:- प्रेम म्हणजे, आम्ही शाळा बुडवल्या मुळे पकडले गेल्यावर त्याने स्वत: एकट्याने भोगलेली शिक्षा. ♥


१८ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, शाळेच्या निरोप समारंभात त्याने मारलेली मिठी आणि खारट आश्रू पीत पुन्हा भेटण्याची ठेवलेली गोड अपेक्षा. ♥


२१ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, माझ्या कॉलेज ची सहल गेलेल्या ठिकाणी त्याने त्याचे कॉलेज बुडवून अचानक दिलेली भेट. ♥


२६ वर्षाची मुलगी :- प्रेम म्हणजे, गुढग्यावर बसून हातात गुलाबाचे फुल घेऊन त्याने मला लग्नासाठी केलेली मागणी. ♥


३५ वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, मी दमले आहे हे बघून त्याने स्वत: केलेला स्वयंपाक. ♥


५० वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, तो आजारी असून, बरेच दिवस बेड वरच असूनसुद्धा मला हसवण्यासाठी त्याने केलेला विनोद. ♥


६० वर्षाची स्त्री :- प्रेम म्हणजे, त्याने शेवटचा श्वास घेताना पुढल्या जन्मात लवकरच भेटण्याचे दिलेले वचन ♥

No comments: