सोबत तुझी भेटली असती
तर हा दुरावा दिसला नसता
माझ्या बरोबर चालली असतीस
मार्ग वेगळा झाला नसता !
मला थोड ओळखलं असतंस
आज चेहरा अनोळखी वाटला नसता !
माझ्याशी तू बोलली असतीस
तर हा अबोला दिसला नसता !
डोळ्यात मला साठवले असतेस
तुझ्या डोळ्यात पाण्याचा थेंब ही दिसला नसता !
मनात मला ठेवले असतेस
मनाला तुझ्या धीर भेटला असता !
आयुष्य माझ्या बरोबर घालवले असतेस
आज तुझे आयुष्य वेगळे दिसले असते !
No comments:
Post a Comment