वाटल नव्हत कधी असही कधी घडेल.....!
एक गोड सोनपरी माझ्या प्रेमात पडेल....
इटुकल्या - पिटुकल्या मेसेज मधून मला वाकुल्या दाखवेल.... .
हळूच एखादा MISS CALL करून मला ती सतावेल.... .
...
वाटल नव्हत कधी असही कधी घडेल.....!
स्वप्नामध् ये माझ्या हळूच कोणीतरी शिरेल.....
बोलायला"काहीच नाही"म्हणून फोनवर तासभर बोलेल....
आणि नेमक महत्वाच बोलताना फोन ठेवण्याची घाई करेल.....
वाटल नव्हत कधी असही कधी घडेल.....!
माझ्याही आठवणीत रात्रभर कोणीतरी जागेल.....
तिच्या विरहाचे चार दिवस चार जन्माचे अंतर दाखवेल.... .
आणि तास-दोन तासांची भेट सुद्धा क्षणभर वाटेल.....
वाटल नव्हत कधी असही कधी घडेल....!
या एकाकी जीवनामध्ये त्या परीचा प्रेमाचा स्पर्श लाभेल..... .
वाटल नव्हत कधी असही कधी घडेल.....!
एक गोड सोनपरी माझ्या प्रेमात पडेल....
No comments:
Post a Comment