कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Sunday, May 13, 2012

प्रेम,

प्रेम,
नुसता शब्द उच्चारला तरी डोळ्या पुढे उभे रहातात
एक तरुण आणि एक तरुणी.....
कॉलेजला जाणारी, चोरून एकमेकांना भेटणारी.
डोळ्या पुढे येतो
पडणारा पाऊस, एखादी एकांतातली जागा.
मनातली हुरहूर.
प्रेमात पडलेल्या त्याला, सगळी कडे तीच दिसते.
आरशातून सारखी ती त्याच्या कडे बघते.
मित्र त्याला नकोसे वाटतात, एकटाच असतो तो.
मनातल्या मनात सगळ काही तिलाच सांगतो तो.
तिचीही परिस्थिती काही वेगळी नसते.
तिचीही परिस्थिती काही वेगळी नसते
मैत्रिणींश ी तीही तशीफटकुनच रहाते
साडी नेसते तेंव्हा त्यानीच बघावस वाटत.
आरश्यात बघून गजरा घालताना तो मागेच तर असतो.
प्रेमात पडल्यावर पाऊस हवाहवासा वाटतो
दोघांशिवाय जगात कोणीच नसावस वाटत
भेटल्यावर दोघही बोलतात एकमेकान बद्दलच
जगात कारण दुसर कोणीच तर नसत.
झाल कधी भांडण तरी ते मिटावस वाटत
दोघांनाही एकमेकांना जास्तच भेटवस वाटत
भांडण तर फक्त निमित्त असत
दोघानाही एकमेकां शिवाय जमायचं नसत.
कधी आधी प्रेम जमत आणि नंतर लग्न होत
कधी आधी लग्न होत अन नंतर प्रेम जमत
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत
तरी सुध्धा प्रत्येकाच ते वेगळच असत.
प्रेमात काही घ्यायचंनसत
दुसर्याला सर्वस्व द्यायचं असत
आधी आपल मन अन मग
स्वताःच असणच हरवायचंअसत.
ह्या हरवण्यातहि एक जगण असत
तिच्या साठी स्वतःला बदलायचं असत
बदलत बदलत आणि एक दिवस
आपणच ती व्हायचं असत

No comments: