चिंब ओल्या पावसाचे गीत गाऊ
वाऱ्यावरी तुषाराचे थेंब होऊ
स्पर्श जुने नव्यानेच भेटतात पुन्हा
ओळखीच्या जराजरा वाटतात खुणा
खुणेवरी अत्तराचे एक बोट ठेवू
चिंब ओल्या पावसाचे गीत गाऊ
वाऱ्यावरी तुषाराचे थेंब होऊ
तरी नंतर व्हायचे तेच होते
मळभले मन सारे वाहून जाते
पसरल्या ओंजळीला रिता हात देऊ
चिंब ओल्या पावसाचे गीत गाऊ
वाऱ्यावारी तुषाराचे थेंब होऊ
कोण म्हणते पावसाला जाग नाही
कुणाच्या का डोळीयात मग आग नाही
राग तुझ्या येण्याचा सरीमध्ये ओऊ
चिंब ओल्या पावसाचे गीत गाऊ
वाऱ्यावारी तुषाराचे थेंब होऊ
No comments:
Post a Comment