Monday, August 20, 2012
Saturday, August 11, 2012
एकटाच
चालताना सोबती
पाऊले जड झाले
प्रेम नाही पण विरहच
माझ्या नशिबी आले
तू दिलेल्या जखमा
खूपच चिघळत आहेत
जगणे ही माझे नकोसे केले
चालताना पाहतो मी
कोण सोबती आहे माझ्या..??
चालताना ही एकटाच मी राहीलो
एकटा मी एकटाच पडलो
एकट्याचे जगणे तूझे हे
शेवटही एकटयानेच जायचे
रडणे आता सोडणे आहे मज
भेटले तयासी आपले मानूनी
चालायचे आहे मज
एकटा मी एकटेच शेवट आहे मज....
BREAKUP
आज हि मी तिला भेटायेला जातो,
BREAKUP नंतर सुद्धा, मी तेच क्षण अनुभवायला जातो,
आधी सारखा आज हि मी, तासान तास तिची वाट पाहतो,
फोन करेल ती म्हणून, फोन हातातच घेऊन हुभा राहतो,
अन ती दिसताच, माझा चेहरा फुलू लागतो...
...
पण पाहता तिला,
आठवतो तो भूतकाळ ....
आठवतं ते झालेलं भांडण,बोललेले शब्द,
भरलेले डोळे आणि BREAKUP नंतर, ती माझी नाही हे कटू सत्य...
तरीहि पाहत राहतो मी तिला, समोरून येताना,
पाणावलेल्या डोळ्याने आठवतो मी, भूतकाळातल्या त्या सोनेरी क्षणांना,
बघते ती मला, पण बोलत काहीच नाही ,
जाते समोरून, पण माझ्यासाठी थांबत नाही?
पुढे जाऊन, मग ती थांबते,
हळूच वळून, माझ्याकडे पाहते ,
भरलेले डोळे, हलकेच पुसते,
अन काहीही न बोलता, ती निघून जाते...
रोज मी तिला पाहतो,अन रोज ती हेच करते,
रोज एकच कोड, माझ्या पुढे ती ठेवून जाते,
काय सांगायच होत तिला, मागे वळून पाहताना?
काय सांगायचं होत तिला, मला असं पाहून जाताना?
Thursday, August 9, 2012
पाऊस आहे अनामिक
पावसाच्या सारिनी
चिंब भीजले अंग
मिठीत येता तुज्या
पुन्हा झाले मी गुंग
पाऊस आपल्या प्रेमाला
नेहमीच साद घालतो
आपण भेटलो की मुदामून
तो भरपूर कोसळतो
ओठांचा स्पर्श होताच
मन माझे मोहरते
पाण्याप्रमाणे मी ही मग
तुज्यावर बरसते
पाऊस आहे अनामिक
दुवा आपल्यातला
बरसतानही प्रेमाचा
सुंदर गाणा गाणारा.....
तरी पाऊस येत नाही
वारा तसा पुराना
गातोच गीत काही
पण नकळत छेडणारा
पाऊस येत नाही
झाली उजाड राने
कोरड्या दिशा दाही
मनसोक्त चिंबवणारा
तरी पाऊस येत नाही
जमतात मेघ हल्ली
उडे दूर पाचोळाही
पण चैतन्य पेरणारा
पाऊस येत नाही
सुकलेत स्त्रोत सारे
भेगाळली भूईही
पण डोळ्यात दाटलेला
पाऊस येत नाही
हंबरे गाय तानी
होते अंग लाही लाही
तरी रानात हरवलेला
पाऊस येत नाही
शब्दात गोठलेली
भिजते वही कधीही
पण मिठीत गवसलेला
पाऊस येत नाही
गेल्या दिंड्या पताके
दुमदुमली पांढरीही
पण भजनात दंगलेला
पाऊस येत नाही
कढ दाटतात आता
जुने आठवतेच काही
गेल्या हस्तात हरवलेला
तरी पाऊस येत नाही
सांजावता दिव्यांना
फुंकतात द्वाड भोई
पण अंधारात गुडुप्पलेला
पाऊस येत नाही
चिंब ओला पाऊस
चिंब ओल्या पावसाचे गीत गाऊ
वाऱ्यावरी तुषाराचे थेंब होऊ
स्पर्श जुने नव्यानेच भेटतात पुन्हा
ओळखीच्या जराजरा वाटतात खुणा
खुणेवरी अत्तराचे एक बोट ठेवू
चिंब ओल्या पावसाचे गीत गाऊ
वाऱ्यावरी तुषाराचे थेंब होऊ
तरी नंतर व्हायचे तेच होते
मळभले मन सारे वाहून जाते
पसरल्या ओंजळीला रिता हात देऊ
चिंब ओल्या पावसाचे गीत गाऊ
वाऱ्यावारी तुषाराचे थेंब होऊ
कोण म्हणते पावसाला जाग नाही
कुणाच्या का डोळीयात मग आग नाही
राग तुझ्या येण्याचा सरीमध्ये ओऊ
चिंब ओल्या पावसाचे गीत गाऊ
वाऱ्यावारी तुषाराचे थेंब होऊ
खरे प्रेम
आपण कितीही प्रयत्न केला तरी एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला प्रियकर , प्रेयसीचे प्रेम मिळू शकणार नाही हे समजल्यावरही त्यासाठी अनाठाई खटाटोप करून स्वतःबरोबरच त्या व्यक्तीलाही त्रास देण्यापेक्षा त्यांच्याकडून मिळणारी निर्मळ , निखळ मैत्री टिकवण्याचा प्रयत्न करा त्यातच खरा आनंद आहे ..
कारण खरे प्रेम मागूनही मिळत नाही मात्र निखळ मैत्री न मागताही भरभरून मिळते .
एखाद्यावर खरंच प्रेम करत असाल तर त्यांना त्रास देण्यापेक्षा त्यांच्या मैत्रीचा मनमोकळेपणाने स्विकार करा .
स्वतःबरोबरच इतरांच्याही मनाचा विचार करा .
हरिश्चंद्रगड (किल्ला)
हरिश्चंद्रगड
किल्ल्याची ऊंची : 4000
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: माळशेज
जिल्हा : नगर
श्रेणी : मध्यम
ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड होय. एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. इतर सर्व किल्ल्यांना मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची पाश्वर्भूमी आहे, तर हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पाश्वर्भूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहुबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्नीपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. १७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली.
गडावर चहापाण्याची व जेवणाची सोय होते. पावसाळ्यात या गडाचे सौदर्य काही औरच असते. वनस्पतींची विविधता या गडाएवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही. करवंद, कारवीच्या जाळी , धायटी , उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात. या भागातील प्राणीवैभव मात्र शिकारींमुळे बरेच कमी झाले आहे. तरीही कोल्हे , तरस, रानडुकरे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी प्राणी आढळतात. गडाचे सर्वोच्च शिखर तारामतीवरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाइची खिंड , आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो.अशा तहेने अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड ’ट्रेकर्सची पंढरी’ ठरतो
पहाण्याची ठिकाणे :टोलारखिंडीच्या वाटेने गडावर आल्यावर आपण रोहीदास शिखरापाशी पोहचतो. येथून तास दीड तासात आपण तारामती शिखरापाशी पोहचतो. शिखराच्या पायथ्याशी हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे.
१ हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर :-
तळापासून या मंदिराची उंची साधारणत सोळा मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच ’मंगळगंगेचा उगम’ असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत, तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणार्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्यात जमिनी खाली एक खोली आहे, यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत ’चांगदेव ऋषींनी’ चौदाशे वर्ष तप केलं होते अशी स्थानिक गावकर्यांची श्रध्दा आहे.
‘शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा । मार्गशिर
तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ।।
हरिश्चंद्रनाम पर्वतु । तेथ महादेव भक्तु ।
सुरसिध्द गणी विरुयातु । सेविजे जो ।। हरिश्चंद्र देवता ।।
मंगळगंगा सरिता ।सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान ।
ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु ।
लिंगी जगन्नाथु ।महादेओ ।।
जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति ।
आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा।। ‘
हे चांगदेवा विषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबांवर, भिंतींवर आढळतात. श्री चांगदेवांनी येथे तपश्चर्या करून ’तत्वसार’ नावाचा ग्रंथ लिहिला. येथील एका शिलालेखावर,
चक्रपाणी वटेश्वरनंदतु । तस्य सुतु वीकट देऊ ।।
अशा ओळी वाचता येतात. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच एक छोटे मंदिर आहे. यातही महादेवाची पिंड आहे. या छोट्या मंदिरासमोरच एक भग्न अवस्थेतील मूर्ती आहेत. त्यातील पाषाणावर राजा हरिश्चंद्र डोंबार्यांच्या घरी कावडीने पाणी भरत असलेला प्रसंग चित्रित केला आहे.
२ केदारेश्वराची गुहा :-
मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या हातास एक गुहा लागते, यालाच केदारेश्वराची गुहा असेही म्हणतात. या गुहेत १ मीटर उंच आणि २ मीटर लांब असे शिवलिंग आहे. यात कंबरभर पाणी आहे. ही गुहा खरंतर चार खांबांवर तोलली होती, पण सद्यस्थितीला एकच खांब शाबूत आहे. याच गुहेत एक खोली ही आहे .खोलीच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आहे. या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावयाची असल्यास बर्फतुल्य पाण्यातून जावे लागते.
३ तारामती शिखर
तारामती शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. याची उंची साधारणत: ४८५० फूट आहे. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुंफेत गणेशाची सुमारे साडेआठ फूटाची भव्य आणि सुंदरमूर्ती आहे.याच गणेश गुहेच्या आजुबाजूला अनेक गुहा आहेत. यातही राहण्याची सोय होते. गुहेच्या समोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाइनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुख आढळतात. माथ्यावर दोन ते तीन शिवलिंग आढळतात.
४ कोकणकडा
कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण आहे. अर्ध्या किलोमीटर परिघाचा, अर्धगोल आकाराचा, काळाकभिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेवाद्वितीय असावा. कड्याची सरळधार १७०० फूट भरेल. पायथ्यापासून कड्याची उंची साधारणत ४५०० फूट भरते. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे. १८३५ मध्ये कर्नल साइक्सला येथे "इंद्रव्रज" दिसल्याची नोंद आहे. इंद्रव्रज म्हणजे गोलाकार इंद्रधनुष्य होय. येथील निसर्गसौंदर्यावर लुब्ध होऊन एका तरुणाने या कड्यावरून उडी घेतली त्याच्या नावाची संगमरवरी पाटी येथे आहे.
पोहोचण्याच्या वाटा : हरिश्चंद्रगड पूर्ण पाहवयाचा असल्यास दोन ते तीन दिवसांची सवड काढली पाहिजे. गडाचा घेरा फार मोठा असल्याने गडावर जाण्याच्या वाटाही अनेक आहेत.
१) खिरेश्वर गावातून :-
सर्वात प्रचलित असणारी वाट ही खिरेश्वर गावातून गडावर येते. या वाटेने येण्यासाठी पुण्याहून आळेफाटा मार्गे अथवा कल्याणहून मुरबाड-माळशेज घाट मार्गे खुबी फाट्यास उतरावे. खुबी फाट्यावरून धरणावरून चालत गेल्यावर, ५ कि.मी अंतरावर खिरेश्वर गाव लागते. हरिश्चंद्रगडावर जाताना खिरेश्वर गावातून अदमासे एक कि.मी अंतरावर खिरेश्वराचे प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर अकराव्या शतकातील यादवकालीन मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरील सभामंडप छताला शिल्प पट्टीका बसवलेली आहे. आतील गाभार्याच्या दाराच्या चौकटीवर शेषशायी विष्णू व परिवाराचे अप्रतिम कोरीव शिल्प आहे. मूषकवाहन गणेशगणेशानी ,वृषभवाहक शीवपार्वती , हंसवाहन ब्रह्म सरस्वती, मयूरवाहन स्कंदषष्टी, नरवाहन कुबेरकुबेरी, मकरवाहन मकररति, अशा अनेक कोरीव प्रतिमा येथील पाषाणावर आढळतात. या मंदिराला ’नागेश्वराचे मंदिर’ असेही म्हणतात. या गावातून दोन वाटा गडावर जातात.
अ) एक वाट ही टोलार खिंडीतून गडावर सुमारे ३ तासात हरीश्चंद्रेश्वर मंदिरापर्यंत पोहचते. टोलार खिंडीत वाघाचे शिल्प पाहायला मिळते.
ब) दुसरी वाट ही राजदरवाजाची वाट आहे. ही वाट पूर्वी प्रचलित होती. आता मात्र वाटाड्याशिवाय या वाटेने गडावर जाऊ नये. या वाटेने आपण गडाच्या जुन्नर दरवाज्यापाशी पोहचतो. या मार्गाने जाताना गावातील विहिरीतून पाणी भरून घेणे आवश्यक आहे, कारण वाटेत कुठेच पाणी मिळत नाही.
२) नगर जिल्ह्यातून ( पाचनई मार्गे) :-
हरिश्चंद्रगडावर जाण्याची एक वाट ही नगर जिल्ह्यातून आहे. यासाठी मुंबई - नाशिक हमरस्त्यावरील घोटी या गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी यावे. राजूरवरून गडावर दोन मार्गांनी चढाई करता येते. राजुर - पाचनई अशी बससेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे २९ कि.मी भरते. पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे ३ तास लागतात. वाट फारच सोपी आहे. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे ६ किमी आहे.
३) सावर्णे - बेलपाडा - साधले असा घाटमार्ग :-
गड सर करण्यासाठी सावर्णे - बेलपाडा - साधले असा घाटमार्ग आहे. मुंबई - माळशेज मार्गावर माळशेजघाट चालू होण्यापूर्वी सावर्णे गाव आहे. सावर्णे गावातून बेलपाडा गावात जाण्यासाठी फाटा फुटतो. या फाट्यावरून २ - ३ किमी गेल्यावर उजव्या हाताला जाणार्या रस्त्याने बेलपाडा गावात पोहोचता येते. मुंबई - माळशेज रस्त्यावरून बेलपाड्या पर्यंत पायी चालत जाण्यास दिड ते दोन तास लागतात. बेलपाडा गावातून साधले घाट मार्गे हरिश्चंद्रगडावर जाता येते. परंतु हा मार्ग फारच अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असलेल्यांनीच हा मार्ग अवलंबावा. येथून बेलपाडा या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे. येथून कड्यातून काढलेल्या साधले घाटाच्या सहाय्याने कोकणकड्याच्या पठारावर जाता येते. या वाटेने मंदिर गाठण्यास सुमारे १० ते १२ तास लागतात.
४) नळीची वाट :-
हरिश्चंद्रगडावर जाण्याची सर्वात कठीण वाट म्हणजे नळीची वाट आहे. नळीच्या वाटेने जाण्यासाठी बेलपाडा या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे. येथून हरिश्चंद्रगड व बाजूच्या डोंगराच्या मधल्या अरूंद घळीतून कोकणकड्याच्या पठारावर जाता येते. बेलपाडा गावात जाण्यासाठी, मुंबई - माळशेज मार्गावर माळशेजघाट चालू होण्यापूर्वी सावर्णे गावात उतरावे. सावर्णे गावातून बेलपाडा गावात जाण्यासाठी फाटा फुटतो. या फाट्यावरून २ - ३ किमी गेल्यावर उजव्या हाताला जाणार्या रस्त्याने बेलपाडा गावात पोहोचता येते. मुंबई - माळशेज रस्त्यावरून बेलपाड्या पर्यंत पायी चालत जाण्यास दिड ते दोन तास लागतात. बेलपाडा गावातून कोकणकड्याच्या दिशेने चालत जाऊन ओढा पार करावा लागतो. चार वेळा ओढा पार केल्यावर वाट कोकणकडा व बाजूचा डोंगर यांच्या मधल्या अरूंद घळीतून वर चढत जाते.ही वाट फारच अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असलेल्यांनीच हा मार्ग अवलंबावा. या मार्गाने कोकणकड्याच्या पठारावर जाण्यास सुमारे ८ ते १२ तास लागतात.
राहाण्याची सोय : गडावरील गुहांमध्ये ५० ते ६० जणांची राहाण्याची सोय होते. तसेच पैसे दिल्यास राहाण्यासाठी तंबू उपलब्ध होतात.
जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय उपलब्ध आहे.
पाण्याची सोय : पाणी विपुल प्रमाणात उपलब्ध आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : १) खिरेश्वर मार्गे ४ तास लागतात. २) पाचनई मार्गे ३ तास लागतात. ३) साधले घाट मार्गे ८ ते १० तास लागतात. ४) नळीची वाट मार्गे ८ ते १२ तास
इंदुरीचा किल्ला (गढी)
इंदुरीचा किल्ला (गढी)
किल्ल्याची ऊंची : 0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले
डोंगररांग: डोंगररांग नाही
श्रेणी : सोपी
तळेगाव - चाकण रस्त्यावर, तळेगाव पासून ३ किमी अंतरावर इंदुरी गाव आहे. या गावात इंद्रायणी नदीच्या काठी एक छोटी गढी आहे. या गढीला इंदुरीचा किल्ला म्हणून ओळखले जाते. छ.शाहू महाराजांचे सेनापती खडेराव दाभाडे यांना वतन म्हणून मिळालेल्या तळेगावाला नंतर तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले. छ.शाहू महाराजांचे सेनापती खडेराव दाभाडे यांनी हा किल्ला बांधला होता. त्यांची समाधी इंद्रायणी नदीच्या काठी असलेल्या पुरातन बनेश्वर मंदिराजवळ आहे. इंदुरी गावापासून भंडारा डोंगर ३ किमी अंतरावर आहे. भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांचे मंदिर व बौध्द कालिन गुहा आहेत.
मुंबई व पुण्याहून वर दिलेली तिनही ऎतिहासिक ठिकाणे एका दिवसात पहाता येतात.
इतिहास : छ. शिवाजी महाराजांचे अंगरक्षक येसाजी दाभाडे यांचे थोरले पुत्र खंडेराव दाभाडे होते. इ.स.१७०५ ते १७१७ मध्ये खंडेराव दाभाडे यांनी गुजरात प्रांतात धडक मारुन बडोदे पर्यंतचा प्रदेश काबिज केला. छ.शाहू महाराजांनी ११ जानेवारी १७१७ मध्ये खडेराव दाभाडे यांची मराठा साम्राज्याचे सरसेनापती म्हणून नियुक्ती केली.
सेनापती खडेराव दाभाडे यांना वतन म्हणून मिळालेल्या तळेगावाला नंतर तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले. इ.स.१७२०-२१ मध्ये खडेराव दाभाडे यांना इंदुरीची गढी बांधली, त्याला "इंदुरीचा किल्ला " ,सरसेनापतींची गढी" या नावानेही ओळखले जाते.
खडेराव दाभाडे यांचे निधन २७ सप्टेंबर १७२९ मध्ये तळेगावच्या जून्या राजवाड्यात झाले. त्याची समाधी इंद्रायणी नदी काठावरील बनेश्वर मंदिराजवळ आहे.
पहाण्याची ठिकाणे :तळेगावहून चाकणला जातांना डाव्या बाजूला इंद्रायणी नदीकाठी किल्ल्याची भक्कम तटबंदी व बुरुज आजही पाहायला मिळतात. या तटबंदीच्या कडेकडेने इंदुरी गावात प्रवेश केल्यावर किल्ल्याचे पूर्वाभिमुख भव्य प्रवेशव्दार दिसते. प्रवेशव्दाराच्या दोनही बाजूस भव्य बुरुज आहेत. किल्ल्याच्या दगडी बांधणीच्या प्रवेशव्दाराच्या कमानीवर दोनही बाजूस शरभ कोरलेले असून मधोमध गणपती कोरलेला आहे. प्रवेशव्दाराच्या वरील बाजूस नगारखाना बांधलेला असून त्याचे बांधकाम मातीच्या वीटा वापरुन केलेले आहे. प्रवेशव्दाराच्या आतील बाजूस पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत.
किल्ल्ल्यावर कडजाई देवीचे मंदिर आहे. किल्ल्याच्या पश्चिमेकडील बुरुजावरून खालून वहाणारे इंद्रायणीचे पात्र व दुरवरचा प्रदेश दिसतो. किल्ल्याची तटबंदीची रूंदी ३ फूट आहे. बुरुजांचा फांजीपर्यंतचा भाग दगडांनी बांधलेला असून त्यावरील भाग वीटांनी बांधलेला आहे.तटबंदी व बुरुजांमध्ये जागोजागी जंग्यांची रचना केलेली आहे.
भंडारा डोंगर :- तुकाराम महाराजांच्या वास्तव्यामुळे पावन झालेल्या भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांचे मंदिर आहे. मंदिराच्या विरुध्द बाजूस असलेल्या भक्त निवासाजवळून एक पायवाट खाली उतरत जाते. या पायवाटेने १५ मिनिटे उतरल्यावर दगडात कोरलेली बौध्द्कालिन लेणी पहायला मिळतात. यापैकी एका गुहेत तुकाराम महाराज साधनेसाठी बसत असत. या लेण्यांमध्ये एक दगडात कोरलेला स्तुप आहे. या स्तुपावरून हि बौध्द लेणी हिनयान कालिन असावीत.लेण्यांसमोर एक बारमाही पाण्याचे टाक आहे.
पोहोचण्याच्या वाटा : मुंबई-पुणे रेल्वेमार्ग व महामार्गावरील तळेगाव हे मोठे शहर आहे. तळेगाव - चाकण रस्त्यावर तळेगाव पासून ३ किमीवर इंद्रायणी नदीवरील २ पूल आहेत. यातील डाव्या बाजूच्या पुलावरुन जाणारा रस्ता इंदुरी गावात जातो, तर उजवीकडील रस्ता इंदुरी गावाच्या बाहेरून जातो. इंद्रायणी नदीवरील पुलावरूनच आपल्याला इंदुरीचा किल्ला दिसायला लागतो. किल्ल्यात जाण्यासाठी तटबंदीच्या कडेकडेने जाणार्या रस्त्याने तटबंदी संपे पर्यंत चालत जावे . पुढे डाव्या बाजूस एक गल्ली आहे. त्या गल्लीत वळल्यावर समोरच किल्ल्याचा भव्य दरवाजा दिसतो.
भंडारा डोंगर :- मुंबई-पुणे रेल्वेमार्ग व महामार्गावरील तळेगाव हे मोठे शहर आहे. तळेगाव - चाकण रस्त्यावर तळेगाव पासून ५ किमीवर डाव्या बाजूस भव्य कमान उभारली आहे. तेथून भंडारा डोंगरावर जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. खाजगी वहानाने डोंगरावरील मंदिरापर्यंत जाता येते.मंदिराच्या विरुध्द बाजूस असलेल्या भक्त निवासाजवळून एक पायवाट खाली उतरत जाते. या पायवाटेने १५ मिनिटे उतरल्यावर दगडात कोरलेली बौध्द्कालिन लेणी पहायला मिळतात.
राहाण्याची सोय : रहाण्याची सोय तळेगावात आहे.जेवणाची सोय : खाण्याची सोय तळेगावात आहे
पाण्याची सोय : पिण्याचे पाणी सोबत बाळगावे.
सूचना : १) मुंबई व पुण्याहून इंदुरीचा किल्ला , बनेश्वर मंदिर, भंडारा डोंगर, चाकणचा किल्ला ही चारही ऎतिहासिक ठिकाणे एका दिवसात पहाता येतात.
ईरशाळ (किल्ला)
ईरशाळ
किल्ल्याची ऊंची : 3700
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: माथेरान
जिल्हा : रायगड
श्रेणी : मध्यम
ईरशाळगड हा कर्जत विभागात येणारा किल्ला आहे.गडावरील विशाळादेवीच्या नावाचा अपभ्रंश होऊन या गडाचे नाव ईरशाळगड झाले असावे. कर्जत, मलंगगड, प्रबळगड हे सर्व कोकणात येणारे किल्ले आहेत. कल्याण - पुणे लोहमार्गावरून जातांना मलंगगड, देवणीचा सुळका, माथेरान, पेब, म्हैसमाळ, प्रबळगड, ईरशाळगड हा परिसर सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. या परिसरातील जनजीवन तसे सर्वसामान्यच आहे पावसाचे प्रमाण मुबलक असल्यामुळे सर्वत्र भाताची शेती फार मोठ्या प्रमाणावर होते. महामार्गापासून गड जवळच असल्याने पायथ्याच्या गावापर्यंत वाहनाने जाण्याची सोय होते.
इतिहास : ईरशाळला गड म्हणणे अयोग्य आहे, कारण ईरशाळ हा एक सुळका आहे. त्यामुळे इतिहासात त्याचा कुठे उल्लेख नाही.गडावरील पाण्याच्या टाक्यांचे अत्सित्व पाहाता याचा उपयोग टेहळणीसाठी केला गेला असावा असे वाटते. मे १६६६ मध्ये शिवरायांनी कल्याण, भिवंडी रायरी पर्यंतचा सारा मुलूख घेतला तेव्हा हा गडदेखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. ईरशाळ म्हणजे प्रबळगडचा सख्खा शेजारी. २३ जानेवारी १९७२ रोजी याच सुळक्यावर एक दु:खद घटना घडली ती म्हणजे, कुमार प्रकाश दुर्वे याचा किल्ल्यावरून पडून दु:खद अंत झाला. त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जानेवारीला मुंबई - ठाण्याचे गिर्यारोहक येथे जमतात.
पहाण्याची ठिकाणे :ईरशाळगड म्हणजे एक सुळकाच आहे. ईरशाळ माची पासून गडावर जातांना, वाटेतच पाण्याचे एक टाकं लागत तेथून पुढे सोपे असे प्रस्तरारोहण करून आपण गडाच्या नेढ्यात पोहोचतो. सध्या येथे शिडी बसविल्यामुळे प्रस्तरारोहण न करता सुध्दा नेढ्यापर्यंत जाता येते.शिडी चढण्यापूर्वी डावीकडे विशाळा देवीची मूर्ती पाहायला मिळते. नेढ्यापासून थोडे वर गेल्यावर, डावीकडे पाण्याचे एक टाकं लागत व बाजूलाच एक कपार आहे. हे पाणी पिण्यास योग्य आहे, नेढ्यातून समोर चढणारी वाट सुळक्यावर जाते. सुळक्यावर जाण्यासाठी प्रस्तारारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यकच आहे. गडमाथ्यावरून समोरच प्रबळगड, माथेरान, चंदेरी, मलंगगड, कर्नाळा, माणिकगड हा परिसर दिसतो.
पोहोचण्याच्या वाटा : मुंबईहून रेल्वेने खोपोली गाठावी. खोपोलीहून एस.टी. किंवा ६ आसनी रिक्षाने २० कि.मी.वरील चौक गाठावे. चौकहून ईरशाळगडाचा पायथा गाठण्यास अर्धा तास लागतो. पायथ्या पासून ईरशाळवाडी मार्गे गडमाथा गाठण्यास दिड तास लागतो.
राहाण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. पण ईरशाळवाडीतील शाळेत राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय : किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय : मार्च पर्यंत गडावरील टाक्यात पाणी असते.
जाण्यासाठी लागणारा वेळ : ईरशाळवाडीतून एक तास लागतो.जाण्यासाठी उत्तम कालावधी : पावसाळा सोडून इतर सर्व ऋतुत गडावर जाता येते.
सूचना : गडमाथा गाठण्यास प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. १०० फूटी रोप व इतर गिर्यारोहणाचे सामान सोबत असणे आवश्यक आहे.
पावसाळा सोडून इतर वेळी गडावर जाण्यास हरकत नाही.
जंजिरा (किल्ला)
जंजिरा
किल्ल्याची ऊंची : 0
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : रायगड
श्रेणी : मध्यम
महाराष्ट्राला सुमारे ७५० कि.मी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्र किनार्य़ावरील किल्ले पाहणे म्हणजे एक आगळी वेगळी आनंदयात्राच ठरते. ही भटकंती चालू होते डहाणूपासून तर संपते तेरेखोल येथे. येथील नारळी फोफळीच्या वनांमधून फिरताना कोकणी समाजाचे दर्शन घडते. रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यात चहुबाजूंनी सागरी पाण्याचा वेढा पडलेला, राजापुरीच्या खाडीच्या तोंडावर मोक्याच्या जागी हा अजेय जलदुर्ग उभा आहे.
इतिहास : जंजिरा किल्ल्यालाच ‘किल्ले मेहरुब ऊर्फ किल्ले जंजिरा’ अशी नावे होती. इ.स. १५०८ मध्ये मलिक अहमद निजामशाहा मरण पावला. त्याचा ७ वर्षाचा अल्पवयीन मुलगा बुर्हाण निजामशाहा गादीवर आला. मिर्झाअल्ली आणि कलबअल्ली हे दोन निजामशाही सरदार उत्तर कोकणातील दंडाराजपुरास आले. त्यावेळी समुद्रातील चाचे कोळ्यांना फार त्रास देत असत म्हणून त्यांनी राजपुरीच्या खाडीवर लाकडी मेढेकोट उभारला. रामपाटील या कोळ्याचा अंमल त्यावेळी त्या सर्व परिसरावर होता. निजामशाहाने पिरमखान नावाच्या सरदाराला रामपाटीलचा काटा काढण्यासाठी पाठवलं. पिरमखानाने मेढेकोटच्या आजुबाजूला गलबते लावली आणि रामपाटीलाला दारू पाजून बेहोष केले व मेढेकोट आपल्या ताब्यात घेतला. रामपाटीलला निजामशाहाकडे पाठवून त्याचे धर्मांतर केले. इ.स १५२६ ते १५३२ च्या कारकिर्दीनंतर इ.स १५३२ मध्ये पिरामखान मरण पावला. पुढे १५६७ मध्ये हुसेन निजामशहाच्या हुकुमानुसार लाकडी मेढेकोटा ऐवजी दगडी कोट बांधण्यास सुरुवात झाली. हे काम इ.स १५७१ पर्यंत पूर्ण झाले आणि हा दगडी कोट ’किल्ले मेहरुब’ नावाने ओळखला जाऊ लागला. पुढे १८५७ मध्ये अलर्गखान याची येथे नेमाणुक झाली. १६१२ मध्ये याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा इब्राहीमखान याची नेमणूक झाली. याच्या मृत्यूनंतर १६१८ ते १६२० च्या कालावधीत सिध्दी सुरुदखान हा ठाणेदार झाला. यानंतर सुमारे १९४७ पर्यंत २० सिध्दी नवाबांनी जंजिरा किल्ल्यावर हक्क गाजवला. मुरुड परिसरातून मिळणारे उत्पन्न आणि खर्च यांची सांगड बसत नसल्याने मलिक अंबरने हा मुलूख तोडून देऊन याठिकाणी नवीन जहागीरदारी स्थापन केली आणि सिध्दी अंबरसानक या मुलूखाची जबाबदारी पाहू लागला. अर्थात या जंजिरा संस्थानाचा संस्थापक सिध्दी अंबरसानकच ठरला.
इ.स १६२५ मध्ये मलिक अंबर मरण पावला जंजिरेकर स्वतंत्र सत्ताधीश झाले होते. २० सिध्दी सत्ताधिशांनी मिळून ३३० वर्षे राज्य केले आणि १९४८ मध्ये जंजिरा संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले. इ.स १६४८ मध्ये शिवरायांनी तळेगड, घोसाळगड आणि रायगड परिसरातील मुलूख जिंकला. १६५७ मध्ये जावळी जिंकली आणि त्यांनी आपली नजर उत्तर कोकणावर वळवली. किल्ले जंजिरा आपल्या ताब्यात आल्याशिवाय उत्तर कोकणावर आपण वर्चस्व गाजवू शकणारा नाही, हे सत्य शिवरायांना उमगले होते. १६५९ मध्ये शिवरायांनी शामराजपंत व त्यांच्या सोबत बाजी घोलपला जंजिरा घेण्यासाठी पाठवले पण, हा पहिला प्रयत्न फसला. पुन्हा १६५९ मध्ये निळोजीपंत रघुनाथ मुजुमदार ,मायाजी भाटकर यांनी जंजिराच्या सिध्दीची कोंडी केली. पण पुन्हा हा प्रयत्न फसला. तिसर्या स्वारीचे वर्णन सभासद बखरीत खालीलप्रमाणे दिलेले आहे.
‘‘ राजियांनी व्यंकोजी दत्तो फौजेनिशी नामजाद रवाना केले. त्यांनी जाऊन मुलूख मारून तलफ केला. मग शिद्दीने आपले जातीचे हापशी लष्कर घोडेस्वार व हशम नामजाद व्यंकोजी दत्तोवर रवाना केले, त्याशी युद्ध झाले, तीनशे हबशी व्यंकोजीपंत मारिले. घोडे पाडाव केले. व्यंकोजीपंत कस्त फार केली, बारा जखमा व्यंकोजीपंतास लागल्या असा चौका बसून आले. शिद्दीने सल्याचे नाते लावले, पण राजियांनी सला केलाच नाही’.’
ही जंजिर्यावरील तिसरी स्वारी होती. १६७८ च्या जुलै मध्ये शिवरायांनी जंजिर्यावर स्वारी करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला. सन १६८२ मध्ये संभाजीराजांनी दादाजी रघुनाथाला जंजिरा घेण्यासाठी पाठवले, पण त्याचवेळी औरंगजेब दक्षिणेत उतरल्याने त्याचा जंजिरा घेण्याचा प्रयत्न अपुराच राहीला. या संस्थानाचा शेवटचा अधिपती म्हणजे सिध्दी मुहंमदखान याच्याच कारकिर्दीत अजेय असे जंजिरा संस्थान ३ एप्रिल १९४८ रोजी भारतीय संस्थानात विलीन झाले.
पहाण्याची ठिकाणे :दंडा राजापुरी गावापासून होडी जंजिरा किल्ल्याच्या पायर्यांपाशी थांबते प्रवेशद्वारावरील पांढर्या दगडातील फारशी लेख स्पष्ट दिसतो. दरवाजाच्या दोन्ही बाजूच्या बुरुजांवर "शरभाचे" दगडात कोरलेले शिल्प आढळते. प्रवेशव्दाराच्या कमानीवर दोनही बाजूला "शरभाचे" दगडात कोरलेले शिल्प आढळते. प्रवेशव्दाराच्या आतल्या बाजूस पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. जंजिरा किल्ल्याच्या महाद्वारावर नगारखाना आहे. किल्ल्याच्या तटावर जाणार्या पायर्यांनी वर गेल्यावर समोरच तटावर तोफा ठेवल्या आहेत, त्यापैकी सर्वात मोठ्या तोफेचे नाव ‘कलाडबांगडी ’ असे आहे.
१ पीरपंचायतन
किल्ल्याच्या प्रवेशव्दारातून आत गेल्यावर डाव्या बाजूला आणखी एक दरवाजा आहे, उजवीकडे खोली सारखे एक बांधकाम आहे यालाच पीरपंचायतन असे म्हणतात. ह्या वास्तूत ५ पीर आहेत. या पंचायतनाच्या पटांगणातच काही वास्तू आहेत. याच ठिकाणी जहाजाचे तीन नांगर गंजलेल्या अवस्थेत पडलेले आहेत.
२ घोड्याच्या पागा
पीर पंचायतनाच्या समोरच्या दिशेने तटावरून पुढे गेल्यावर घोड्याच्या पागा लागतात.
३ सुरुलखानाचा वाडा
येथून बाहेर पडल्यावर समोरच ३ मजली पडकी परंतू भक्कम बांधणीची इमारत दिसते, यालाच "सुरुलखानाचा वाडा" असे म्हणतात अनेक वर्षात या वाड्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे.
४ तलाव
या वाड्याच्या उत्तरेस सुंदर बांधकाम केलेला शोडषट्कोनी गोड्या पाण्याचा तलाव आहे. हा तलाव सुमारे २० मीटर व्यासाचा आहे. तलावाच्या चार कोपयात चार हौद आहेत.
५ सदर
बालेकिल्ल्याच्या मागे चुनेगच्ची इमारत आहे, यालाच सदर असे म्हणतात.
६ बालेकिल्ला
तलावाच्या बाजूने बांधीव पायर्यांनी थोडे वर गेल्यावर बालेकिल्ला लागतो. आज तेथे एक झेंडा उभारलेला आहे.
७ पश्चिम दरवाजा
गडाच्या पश्चिमेला तटाखाली, तटातून बाहेर पडण्यासाठी छोटा दरवाजा आहे, यालाच दर्या दरवाजा असे म्हणतात. संकटकाळी बाहेर पडण्यास याचा उपयोग होत होता. दरवाजाच्या वरच्या भागातच तटबंदीच्या जवळ कैदखाना होता. किल्ल्याला स्वतंत्र असे २२ बुरुज आहेत. आजही ते सुस्थित आहेत. सर्व किल्ला पाहण्यास तीन तास लागतात.
पोहोचण्याच्या वाटा : १ अलिबाग मार्गे :-
जंजिरा जलदुर्ग पाहायचा असेल तर, पुणे ,मुंबई मार्गे अलिबाग गाठावे. पुढे अलिबागवरुन रेवदंडामार्गे मुरुड गाठता येते. मुरुड गावातून ५ कि.मी. वरील दंडा राजापूरी गाव गाठावे .दंडा राजापूरी गावातून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बोटसेवा उपलब्ध आहे. किनार्या पासून शिडाच्या बोटीने किल्ला गाठण्यास अर्धा तास पुरतो.
२ दिघी मार्गे :-
कोकणातून यायचे झाल्यास महाड - गोरेगाव - म्हसळे - बोर्लिपचंतन - दिघी गाठावे दिघीहून किल्ला पाहण्यासाठी बोटसेवा उपलब्ध आहे.
३ पाली- रोहा - नागोठणे - साळाव - नांदगाव - मार्गे :-
अलिबाग मार्गे न जाता पाली - रोहा - नागोठणे - साळाव - नांदगाव मार्गे मुरुडला जाता येते.
राहाण्याची सोय : मुरुड गावात राहाण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय : मुरुड गावात जेवणाची सोय होते.
पाण्याची सोय : गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ : दंडा राजापूरी गावापासून बोटीने अर्धा तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी : पावसाळा सोडून इतर सर्व ऋतुत गडावर जाता येते.
सूचना : मुरुडला २ दिवस मुक्काम करून जंजिरा , सामराजगड आणि पद्मदुर्ग हे किल्ले पाहाता येतात.
जीवधन (किल्ला)
जीवधन
किल्ल्याची ऊंची : 3754
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: नाणेघाट
जिल्हा : पुणे
श्रेणी : मध्यम
घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता.
इतिहास : शिवजन्माच्या वेळी निजामशाही अस्ताला जात होती, १७ जून १६६३ रोजी निजामशाही बुडाली शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज ’मूर्तिजा निजाम’ याला जीवधन या गडावर कैदेत असताना त्याला सोडवून संगमनेरजवळ असणार्या पेमगिरी किल्ल्यावर घेऊन गेले. त्याला निजामशहा म्हणून घोषित केले आणि स्व:त वजीर बनले. गाव गोरक्षगडाप्रमाणे या गडांचा दरवाजादेखील कातळकड्यामध्ये कोरलेला आहे
पहाण्याची ठिकाणे :गडाचा आकार आयताकृती आहे. पश्चिम दरवाज्याने गडावर पोहोचल्यावर समोरच गजलक्ष्मीचं शिल्प आहे गावकरी याला ’कोठी’ असे संबोधितात. जवळच पाण्याची टाके आहेत. दक्षिणेस जीवाई देवीचे पडझड झालेले मंदिर आहे. तसेच गडावर अंतर्भागात एकात एक अशी पाच धान्यकोठारं आहेत. आत कमलपुष्पे कोरलेली आहेत. शेवटच्या इंग्रज मराठे युद्धात १८१८ मध्ये या कोठारांना आग लागली होती. ती राख आजही या कोठारांमध्ये आढळते. गडाच्या एका टोकाला गेल्यावर समोरच दोन हजार फूटांचा वांदरलिंगी सुळका लक्ष वेधून घेतो. गडावरून नानाचा अंगठा, हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड, कुकडेश्वराचे मंदिर, धसइचे छोटेसे धरण, माळशेज घाटातील काळे तुकतुकीत रस्ते न्याहाळता येतात.
पोहोचण्याच्या वाटा : १ कल्याण - नगर मार्गे :-
कल्याण - नगर मार्गात नाणेघाट चढून गेल्यावर पठार लागते. या पठारावरून उजवीकडे जंगलात एक वाट जाते. या वाटेने दोन ओढे लागतात, हे ओढे पार केल्यावर एक कातळभिंत लागते. या भिंतीला चिकटून उजवीकडे जाणारी वाट वांदरलिंगी सुळक्यापाशी घेऊन जाते, तर डावीकडे जाणारी वाट एका खिंडीपाशी पोहोचते. जीव मुठीत धरून त्या उभ्या कातळभिंती पार केल्यावर पुन्हा कातळात खोदलेल्या पायर्या लागतात. सन १८१८ नंतर सुरुंग लावून इंग्रजांनी हा मार्ग चिणून काढला व पश्चिम दरवाज्याची वाट बुजवून टाकली. या दरवाज्याने वर जाण्यास अनेक वानरयुक्त्या योजाव्या लागतात. वाट जरा अवघडच असल्याने जपूनच जावे लागते. (नाणेघाटला कसे पोहोचावे हे पाहाण्यासाठी साईट वरील नाणेघाटाची माहिती वाचावी.)
२ जुन्नर - घाटघर मार्गे :-
गडावर जाणारी दुसरी वाट जुन्नर - घाटघर मार्गे राजदरवाज्याची आहे. ही वाट घाटघरहून सरळ गडावर जाते. हि वाट अत्यंत सोपी आहे.
राहाण्याची सोय : गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय : गडावर बारमाही पाण्याची टाकी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ : घाटघर गावातून जीवधनवर जाण्यास २ तास लागतात.
इंद्राई (किल्ला)
इंद्राई
किल्ल्याची ऊंची : 4490
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: अजंठा सातमाळ
जिल्हा : नाशिक
श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीची एक डोंगररांग सुरगणा पासून चालू होते आणि चांदवड पर्यंत येऊन संपते. पुढे तीच मनमाडच्या जवळ असणार्या अंकाइ किल्ल्यापर्यंत जाते. याच रांगेला अजंठा - सातमाळ रांग म्हणतात. चांदवड तालुक्यात ४ किल्ले येतात, राजधेर, कोळधेर, इंद्राई आणि चांदवड .
पहाण्याची ठिकाणे : राजधेरवाडी किंवा वडबारे मार्गे गड चढतांना आपण कातळ भिंतीपाशी येऊन पोहोचतो. या कातळकड्यापाशी कातळात खोदलेल्या २ गुहा आहेत. यापैकी एका गुहेत पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. हि कातळभिंत कोरुन गडावर जाण्याचा मार्ग बनविलेला आहे. याची रचना एका बाजूने कापलेल्या नळी सारखी आहे. या मार्गावरून चालतांना आपल्या माथ्यावर कातळभिंतीचे छत असते. या मार्गाने ५० पायर्या चढून गेल्यावर वाट काटकोनात वळते. येथे कातळ फोडून खिंडी सारखी रचना केलेली आहे. या मार्गाने अंदाजे १०० पायर्या चढून गेल्यावर प्रवेशद्वाराच्या अलिकडेच डाव्या बाजूच्या कातळात कोरलेला फारसीतील शिलालेख पाहायला मिळतो. गडाच्या प्रवेशद्वाराचे अवशेष केवळ आजमितिस शिल्लक आहेत. प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश केरुन पुन्हा थोडी चढाइ केल्यावर समोरच्या बाजूस व उजवीकडे कातळात खोदलेल्या गुहा दिसतात. याच ठिकाणी तीन वाटा फूटतात. प्रथम उजवीकडची वाट पकडावी थोड्याच अंतरावर कातळात खोदलेल्या गुहांची रांग दिसते. येथून समोर राजधेर व डावीकडे कोळधेर किल्ला दिसतो. दूरवर धोडप, इखारा, कांचना, रवळ्या-जावळ्या इत्यादी किल्ले दिसतात. या सर्व गोष्टी पाहून परत मागे फिरावे. नंतर वर जाणारी वाट पकडावी. थोडे अंतर चढून बुजलेले पाण्याचे टाक आणि वास्तुचे अवषेश पाहायला मिळतात. येथून सरळ वर चढत जाणारी वाट गडाच्या सर्वोच्च टोकावर जाते. तर वास्तुच्या बाजुने खाली उतरणारी वाट पकडून गेल्यास कातळात खोदलेले महादेवाचे मंदिर लागते. मंदिरासमोर दगडात बांधून काढलेला तलाव आहे. मंदिराच्या बाजूला कातळात खोदलेली अरुंद गुहा आहे. मंदिरावरुन पुढे जाणार्या वाटनेही गडाच्या सर्वोच्च टोकावर जाता येते .महादेवाचे दर्शन घेऊन परत मागे फिरावे आणि आता डावीकडची वाट पकडावी. थोडे पुढे गेल्यावर कातळात खोदलेल्या १८ ते २० गुहांची रांग दिसते.या गुहांमध्ये कोण्त्याही प्रकारचे कोरीवकाम आढळत नाही. यापैंकी काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत. गुहेंच्या रांगेच्या शेवटी बारमाही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. येथून समोर २ शिखरे असलेला डोंगर दिसतो, त्याला दोन रोडग्यांचा डोंगर असे म्हणतात. या डोंगराच्या मागे नाशिक - धुळे महामार्ग आणि त्याच्या मागे चांदवड किल्ला दिसतो. पिण्याच्या पाण्याच्या टाक्याच्या बाजूला एक सुकलेले टाक आहे.पिण्याच्या पाण्याचे टाके व गुहंमधील कातळावर पायर्या खोदलेल्या आहेत. या पायर्या चढून डाव्या बाजूने गेल्यास आपण महादेवाच्या मंदिरा समोरील तळ्याजवळ पोहोचतो.
पोहोचण्याच्या वाटा : १) राजधेरवाडी मार्गे :-
चांदवडहून राजधेरवाडी कडे जाणारी बस पकडावी आणि राजधेरवाडीत उतरावे. वडबारे गावाच्या पुढे राजधेरवाडी आहे. राजधेरवाडी हे राजधेर व इंद्राई किल्ल्यांच्या पायथ्याचे गाव आहे. राजधेरवाडी गावामागे इंद्राई किल्ला आहे. गावातून एक कच्चा रस्ता इंद्राई किल्ल्याच्या डोंगराकडे जातो. वाटेत एक ओढा ओलांडावा लागतो. मळलेल्या पायवाटेने सुमारे अर्धा तास चढाइ केल्यावर एक पठार लागते. येथून कातळ भिंतीच्या डाव्या टोकापर्यंत पोहोचण्यास सुमारे १ तास लागतो. किल्ल्याच्या कातळकड्यापाशी वडबारे गावातून येणारी वाट येऊन मिळते. कातळकड्यापाशी पोहोचल्यावर त्याला वळसा घालून राजधेरवाडी गावाच्या विरुध्द दिशेला गेल्यावर, कातळात खोदलेल्या पायर्यांची वाट आपल्याला गडावर घेऊन झाते. या वाटेने किल्ला गाठण्यास २ ते ३ तास लागतात.
२) वडबारे मार्गे :-
चांदवडहून राजधेरवाडी कडे जाणारी बस पकडावी. चांदवड पासून ६ किंमी अंतरावर असणार्या वडबारे गावात उतरावे. वडबारे गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी एक ठळक पायवाट आहे. या वाटेने किल्ल्यावर जातांना एक झाप लागतो. ही वाट किल्ल्याच्या कातळकड्यापाशी राजधेरवाडीतून येणार्या वाटेला येऊन मिळते. गावातून किल्ल्यावर पोहचण्यास ३ तास लागतात.
राहाण्याची सोय : किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहेत, तसेच महादेव मंदिरात ५ जणांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय : किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय : किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : वडबारे गावातून ३ तास लागतात. राजधेरवाडी गावातून २ ते ३ तास लागतात.
सूचना : १) राजधेरवाडी हे राजधेर व इंद्राई किल्ल्यांच्या पायथ्याचे गाव आहे. त्यामुळे येथे २ दिवस मुक्काम करून दोनही किल्ले पाहाता येतात. तसेच तिसर्या दिवशी राजधेर ते कोळधेर हा ट्रेक करता येतो. त्यासाठी गावातून वाटाड्या घेणे आवश्यक आहे. राजधेर - कोळधेर - राजधेरवाडी हा ट्रेक करण्यास साधारणतः १० ते १२ तास लागतात.
उगाचच वाटायचं
उगाचच वाटायचं
तू कधी विसरू नये मला
देवळातल्या पणतीसम
जळत राहाव सदा
पण तस् नसत कधी
सुगंधहि जातो सोडून फुलांना
पानही नसतात अनंत
बर्फाचहि होत पाणी
पाण्याचीही वाफ
जाऊ दे झाल
फक्त एक मात्र कर
एक फुल मात्र
प्रेमाने
विसरू नकोस कबरीवर वाहायला
आणि हो
मेणबत्ती एक पेटवायला...
आज पुन्हा वाटले
आज पुन्हा वाटले लहान व्हावे
चिंब पावसात वेड्यासारखे भिजावे
सगळ काही मनासारख झाल पण
भिजलो म्हणून आई रागावलीच नाही
म्हणून तेवढी मज्जा आलीच नाही ....
आज पुन्हा नवीन होडी बनवली
वाहणाऱ्या त्या वळचणीला लावली
सगळ काही मनासारख झाल पण
होडी बरोबर पळायला कोणी नाही
म्हणून तेवढी मज्जा आलीच नाही .....
आज पुन्हा वाटले चिखलात उतरावे
मस्त दलदलीला मी पायाने तुडवावे
सगळ काही मनासारख झाल पण
चिखल उडवायला कोणीच नाही
म्हणून तेवढी मज्जा आलीच नाही ....
ती झुळुक मीच असेन
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेन ..!
माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेन ..!
कधी जर पाहशील पौर्णिमेच्या तु
चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर
त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच
असेन ..!
कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुक मीच असेन...
प्रीत माझी न तुझी
प्रीत माझी न तुझी
निळसर त्या आकाशाखाली..
मोगरा पहा खुलतो आता
घनदाट तुझ्या केसाखाली...!!!
वेड्या प्रेमाची भाषा वेडी
घट्ट तुझ्या मिठिखाली..
आकंठ बुडून गेलो मी
गुलाबी तुझ्या पदराखाली...!!!
हळव्या मनाची तगमग
चंचल तुझ्या सावलीखाली..
तराना तुझा असा कसा
नाही का मुक्काम तुझा
माझ्या साध्या छपराखाली...!!
Sunday, August 5, 2012
मैत्री दिनाच्या खुप खुप शुभेच्छा....
मैत्री दिनाच्या खुप खुप शुभेच्छा....
मैत्री
मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात
आधाराची उणीव
मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश
मैत्री म्हणजे सुख दु:ख
मैत्री म्हणजे हर्श
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा
हळुवार स्पर्श
मैत्री म्हणजे रान
मैत्री म्हणजे कोवळे उन
मैत्री म्हणजे जीव जडणारी
सुमधुर वार्याची धुन
मैत्री म्हणजे खेड
मैत्री म्हणजे पायवाट
मैत्री म्हणजे पिकाला
पाणी पाजणारा मळ्यातील पाट
मैत्री म्हणजे तेज
मैत्री म्हणजे तारा
मैत्री म्हणजे प्रत्येकाला
हवा असणारा मोहक वारा
मैत्री म्हणजे दिलेला शब्द
मैत्री म्हणजे आन
मैत्री म्हणजे घातलेली शपथ
मैत्री म्हणजे प्राण
मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवण
मैत्री म्हणजे आयुश्यातील
न सम्पणारी साठवण..
Happy Friendship Day.....
वेडे हे मन माझे...
एकदाची उगवली ती सकाळ
वाट पहात होतो जिची
...होते मन उतावीळ
तिच्या तोंडुन ते शब्दं ऎकण्यासाठी
पण ते शब्दं माझ्यासाठी
नव्हतेच कदाचीत
त्यानंतर वाईट असे कधी
वाटलेच नाही
डोळ्यात ह्या अश्रु
कधी तरळलेच नाहीत
ह्या पुढे कदाचीत प्रेमाचा
विचारही हे मन करणार नाही
हसायच्या आधी खुप
वेळा विचार करेल हे मन
आहे खात्री मला ती विसरणार नाही
तरीही मी काही बोलणार नाही
असे असुनही वेडे हे मन माझे
काही केल्या शांत बसेना
आजही मनात कुठेतरी आहे एक आस
की ती येईल परत कदाचित...
कारण ती मला आपला "best friend" मानायची ..
मला वाटायच तीच माज्यावर जीवापाड प्रेम आहे .
फ़क्त मी विचारायची देरी आहे ..
मलाही ती प्रचड आवडायची
...जेव्हा ती मला आपला "best friend" म्हणायची ,
... मनातल गुपित फोडायची ,
लाडत येऊन बोलायची ,
लटक रागवायाची ,
माज्याशी भान्डायची ,
गप्पा मारायची ..
माज्या कविता ऐकायाची,
त्याना उत्सुर्फ़ दाद द्यायची ..
माज्यावर प्रेम करायची ..
पण मला माहित नव्हत ती मला
फ़क्त आपला "best friend " मानायची ..
मला खुप यातना जाल्या, जेव्हा ती म्हणाली .
"मी प्रेमात पडले रे त्याच्या...."
पण तिच्या अपेक्षेप्रमाणेच मी तेव्हा तिची थट्टा केली .
अन तिची कळी लगेचच खुलवली,
तिला काय सांगू काय नको जालेल.
असे तिला मी कितीदा तरी पहिलेल .
मी म्हणालो, "मज़ा आहे बुवा एका मुलीची.!"
ती म्हणाली," तुला पण मिळेल रे साथ कोणा सुन्दरीची.!"
मन रडत असतानाही रडत होतो.
तिला कलू न देण्याची सगळी काळजी घेत होतो .
तिला पण काहीच कळल नाही .
प्रेमात पडलेल्या तिला वेगळ काहीच दिसत नाही .
मी पण तसदी घेतली नाही मनातल काही बोलायची..
कारण ती मला आपला "best friend" मानायची ..
ती गेल्यावर मी सुन्न जालो ,
आतल्या आत मी मग्न जालो ,
तिच्या आठवणी मी आठवू लागलो .
त्या पुसून टाकायचा निष्फ़ळ प्रयत्न करू लागलो ,
तिच्याशी बोलताना मी तिची खुप थट्टा करायचो .
'त्याच्या' नावाने तिला भरपूर चिडवायचो .
कोणाशी भांडल्यावर मात्र तिला माजी आठवण यायची .
आजही माज्या मध्यस्थीची तिला गरज वाटायची ,
ती अजुन ही माज्याशी खुप बोलायची ,
खुप काही सांगायच म्हणायची ,
पण कधी ते सांगायला विसरायाची..
मनातले अश्रु मी तिला कधीच दिसू दिले नाहीत ,
कारण ती मला तिचा " best friend " मानायची .
मी मात्र आतल्या आत कुढत बसायचो,
माज्याच एकटेपणात हरवलेला असायचो.
तिचे बोलणे ऐकत असताना ,
मुकपणे आपले अश्रु गिळत असायचो
तिच्यासमोर नाटक करणे फारच कठीण होते .
त्याच तीच भांडण ती मला येऊन सांगायची .
माज्याशी बोलून मोकळ वाटल अस म्हणायची.
स्वत:च्या वेदना लपवून तिचे बोलणे..
शांतपणे ऐकून घ्यायचो .
एक दोन गोष्टी सांगून..
तिला बरे वाटावे असे काहीतरी करायचो ..
माज्या बोलन्यापेक्षा माज्या असन्यावरच ती समाधानी असायची ..
कारण ती मला तिचा" best friend " मानायची ..
आधेमधे तिलापण काही तरी हुक्की यायची ,
कोणाच्याही नावावरून मला चिडवून पहायची .
मीही हसून खोटा राग दाखवायचो ,
तिच्या चीडवन्यावर खोटे चिडून तिला खुष करायचो .
माज्या वेदना आणि दुःख कधीच दाखविले नाही ,
एका शब्दाने ही तिला कलु दिले नाही .
त्या दिवशी त्याची आणि माजी भेट जाली..,
माजी ठसठसणारी जखम पुन्हा उघडी पडली ..
तिने माजी ओळख चांगला मित्र म्हणुन करून दिली .
मी भेट दिलेल्या "माज्या कविताची वही" त्याला दाखविली.
दुसरयाच दिवशी त्याने तिला आपली कविता भेट दिली..
कारण त्याला कदाचित तिच्या बद्दल असुरक्षितता भासली .
तिला मात्र कधीच याची भिती नाही वाटायची..
कारण ती मला तिचा" best friend " मानायची .
तिच्या लग्नामधे तिने मला आवर्जुन बोलावले..
"लग्नाला नक्की यायचे " असे पत्रिकेत लिहून पाठविले .
माज्या ह्रुदयाची शकले मीच गोला केली ,
एक तिच्या आवडीचे गिफ्ट घेवून तिची भेट घेतली ..
चेहरा हसरा ठेवून मी काळजी घेतली तिला खूष ठेवायची .
कारण ती मला तिचा "best friend" मानायची..
तिच्या लग्नानंतर मात्र मी एक गोष्ट केली
कटाक्षाने तिची भेट टाळली .
माज्या वागन्यातला फरक .
तिला कलू द्यायची माजी तयारी नव्हती ..
कारण त्याच्या प्रेमात बुडालेल्या तिला..
माज्या अश्रुंची मुळीच कदर नव्हती .
मी इतके दिवस असे काही दाखवले नाही
कारण ती मला फक्त तिचा"best friend " मानायची ..
आयुष्यभर एकट राहून जगत आलो,
तिच्या पत्राना जानून बुजुन एक दोन ओळीत उत्तर लिहू लागलो
माज्या बिजी लाइफचा चांगला बहाना माज्या कड़े होता..
तिच्याही व्यापनमुले तिला आजिबत वेळ नव्हता ..
तरी पण माज्या एक दोन ओळीना ती उत्तर पाठवायची ..
कारण ती मला तिचा "best friend" मानायची..
तिच्या अखेरच्या क्षणी मी तिला भेटलो ,
इतके दिवस थाम्बलेल्या अश्रु संकट बोललो ..
शेवटच्या घटका मोजताना तिला फार बोलावले नाही ..
मलाही जास्त वेळ थाम्बवले नाही .
तरीही एका वाक्यात तिने सांगितले ..
"तू आता पर्यंत खरे मित्रत्व दाखवले "
डोळ्यानीच ती म्हणायचे ते म्हणाली ,
ती मला तिचा "best friend " मानायची..
आता माजाही प्रवास संपत आला आहे ,
मागे बघताना त्या हीरवळीचा हेवा वाटत आहे ,
आताच पोस्टमन येवुन हे पारसल देवून गेला ..
माज्या मनात प्रश्नांचे काहुर माजवुन गेला .
काय गरज होती का तिला तिच्या मृत्युपत्रात
आवर्जुन माज्या साठी काही ठेवायची ...!
पण नाही , कारण ...
ती मला तिचा "best friend " मानायची..
तिच्या डायर्यांमधे सापडले ,
माजे हरवलेले क्षण, आठवणी ,
खोडया, थट्टा, हसने, बोलणे, रडणे..,
गुपित, गोष्टी, गाठी, भेटी ...
मैत्री आणि बरच काही ..
Subscribe to:
Posts (Atom)