कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Sunday, March 18, 2012

असं प्रेम करावं


थोडं सांगावं थोडं लपवावं,
असं प्रेम करावं
थोडं रुसावं थोडं हसावं,
असं प्रेम करावं
गुपचुप फोन वर बोलावं,
कोणाची नाज़र पडताच पटकन "अगं" चा "अरे" करावं
असं प्रेम करावं

जग पुढे चाललं असलं
तरी आपण मात्र थोडं मागेचं रहावं,
फोन, SMS, आणि E-MAILS च्या जगात ही,
आपण मात्र पत्र लिहुन मांडावं,
असं प्रेम करावं

कुठे भेटायला बोलवावं,
पण आपण मात्र उशिरा जावं
मग आपणच जाऊन sorry म्हणावं,
असं प्रेम करावं

वर वर तिच्या भोळसट पनाची,
खूप चेष्टा करावी,
पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं,
असं प्रेम करावं

प्रेम ही एक सुंदर भावना,
हे ज़रूर जाणावं,
पुन त्या बरोबर येणार्‍या वेदनांना ही सामोरं जावं
असं प्रेम करावं

विरह येतील, संकट ओढवतील,
प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील,
पण आपण मात्र खंबीर रहावं,
असं प्रेम करावं

एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं ... असं प्रेम करावं

आठवण..

खूप विसरण्याचा प्रयत्न करतो पण विसरू शकत नाही..

तिच्याशी कितीही बोललो तरीही मन भरत नाही.

का येत असते तिची नेहमी आठवण..

कारण कदाचित माझ्या मनात करून ठेवलीये तिची साठवण.

पुन्हा गेला आजचा दिवस तसाच भांडणात आणि रुसण्यात.

पण खर सांगतो प्रेमात वेगळीच मज्जा असते रुसून बसण्यात.

अजूनही पाहतोय तीच्या एका SMS ची वाट.

जशी रोज वाहून नेते मला ती स्वप्नांची लाट.

इतकच सांगायचय तिला कि जरा अजून काही क्षण पहा माझी वाट.

नक्कीच येयील तो क्षण..आणि त्यात आपण दोघांना वाहून नेणारी प्रेमाची लाट.

कळत ग मला...

तुझ माझ्या कडे पाहन,
मी पाहताच, पट्कन नझर फिरवण...
अन मी नझर फिरवताच,
मला चोरून चोरून बघन...
कळत ग मला...

तुझ सगळ्यांशी खूप खूप बोलन,
पण माझ्याशी अबोल राहण...
अबोल राहून हि,
नझरेने खूप काही सांगण ...
कळत ग मला...

मित्रान बरोबर समुद्र किनारी फिरताना,
माझ ते मावळत्या सूर्याला एकट बसून पाहन,
मला पाहून तुझ माझ्याकडे येन,
अन कोणाच्या हि नकळत,
तो मावळता सूर्य माझ्या बाजूला बसून बघन ...
कळत ग मला...

तुझ्या मनातल गुपित,
तू कोणालाही न सांगण..
पण तुझ्या वागण्यातून,
ते मला नेहमीच कळन ...
आपण बरोबर चालताना,
तुझा हात माझ्या हाताला लागण,
अन सगळ्यांच्या नकळत,
तुझ हळूच माझा हात धरण...
कळत ग मला...

तुझ अबोल राहून,
माझ्यावर जिवापार प्रेम करण...
मला ते कधीच नाही कळणार,
अस नेहमीच समजत राहण ...
अन तुझ्याच नकळत,
माझ हि तुझ्यावर,
तितकच प्रेम करण...
कधी कळल का ग तुला....
कधी...
कळल...
का ग तुला..

आठवण नाजुक क्षणांची

पुन्हा आठवण आली आज
त्या नाजुक क्षणांची

काही वेळ तरी हाती सोबत
त्याच्या आपले पणाची
...
खांद्यावरती डोके ठेवून
दु:ख आपले सांगण्याची

एकमेकांचे हात धरून
प्रित फुलांना जपण्याची

समुद्राच्या लाटांन सारखे
ऊंच ऊंच उडण्याची

क्षितीजातील त्या शुन्याकडे
एक टक पाहण्याची

दोघांनी मिळून बघितलेल्या
सुंदर सुंदर स्वप्नांची

पुन्हा आठवण आली आज
त्या नाजूक क्षणांची

माझी आठवण


माझी आठवण कधीतरी येईल तुला
जुन्या आठवणीत मग तू शोधशील मला....

कुणालातरी माझी आठवण सांगताना तू हसशील
पण त्या आठवणीत मला पाहताच तू रडशील.....

आठवेल तुला डोंगर आणि किल्यात आपल्या दोघांच फिरण
तुझ्या स्मित हास्यस मी स्वता हरवून जान.....

तू माझा हातात हात घेउन अनेक स्वप्न सजवन
माझ्या डोळ्यात पाणी येताच मला हसवण.....

आठवेल तुला आपल्या मैत्रीचा तो जुना पाउस
एकाच गाडीवर पाउसात भिजणारी ती आपली हाउस.....

माझी आठवण येताच मी जवळ असल्याच तुला भासेल
तुझ्या डोळ्यातून निघालेला अश्रुचा प्रतेक थेंब मी असेल.....

तू एकटा बसल्यावर आठवेल तुला प्रतेक क्षण
त्या क्षणांमधे दिसेल तुला माझ तडफडणार मन.....

माझी आठवण कधीतरी येईल तुला
व्याकुळ होउन तुझ मन शोधेल मला.....

माझी आठवण कधीतरी येईल तुला ....
माझी आठवण कधीतरी येईल तुला ....

तू फक्त हो म्हण

मी म्हंटल "अगं मी काहीही करेन तुझ्यासाठी
तुला हसतं पाहण्यासाठी, तुझी आस्व पुसण्यासाठी
तू फक्त हो म्हण ग..."

तिनेही लाजत म्हंटल "हो राजा मी तुझीच आहे रे,
माझ्याही श्वासाला गरज तुझीच आहे रे"

मग कसं कोण जाने, ती माझ्या मिठीत विरून गेली,
विर्घळूनच गेली, अगदी माझ्याही नकळत!!
आता मी मी राहिलो नव्हतो, न ती ती उरली होती
दोघानाही आता ओढ लग्नाची लागली होती..
मग न जाने का , नजर माझीच लागली .....

मी तिला अचानक माझ्या लग्नाची खबर सांगितली
अन थोड्याच वेळात रूम तिची गाठली पत्रीकेसोबत...
त्या भाबडीने हात तिचा कापला होता ..
मी जाण्यापूर्वी श्वास कधीच सोडला होता...
येऊन पाहून जा ग
पत्रिका आपल्याच लग्नाची आहे..
सोंग केलं होतं ग मी सारं...
फक्त तुला जळवण्यासाठी ...
आज तिच्या प्रेतासोबत माझंही प्रेत जळतंय...
जीव सोडला आहे....तरीही काळीज रडतंय.

मुलीच्या मनातलं..

कोणाला तू आवडत नसलास,
तरी मला का खूप आवडतोस..
नयनी तुझीचं स्वप्ने
ओठांवर तुझेचं नाव,
मनात तुझेचं विचार
आजकाल हे रे असे का ?
प्रेमाची हि नशा असावी कि,
ह्याला तुझीचं जादू म्हणावी ?
ओढ तुझ्या प्रीतीची मला
स्वस्थ बसू देत नाही,
कामात हि आजकाल का
कुठेच लक्ष लागत नाही ?
आपली सगळी परकी वाटतात,
आणि तूचं का आपलासा वाटतोस ?
पण तुला कळत नाही
माझ्या हृदयाचे दु:ख,
कारण बघावं तेव्हा तू तर
असतोस आपला रुक्ष..
चल ये ना आणि मला तुझ्या कुशीत घे,
नेहमीच्या त्या आपल्या स्वप्नांच्या नगरीत
ने..

Friday, March 16, 2012

मेसेज

त्यादिवशी रात्री त्याचा अचानक
मेसेज आला.मला खुप बरे वाटले.
मी विचार केला कालचे भांडण
तो विसरला असेल पण
माझ्या विचारांचा चक्काचूर झाला कारण
तो ब्रेकअपचा मेसेज होता. ते
वाचल्यावर मी जास्त मनावर
दडपण न घेता लगेच रिप्लाय
केला: चालेल. त्याला माझा रिप्लाय बघून
हेच वाटलं असणार
की मला काहीच फरक पडत
नाही त्याच्या जाण्याने. पण
त्याला काय
माहित....माझी काय हालत झालेली, मनातून मी खुप खचलेली. एवढा वेळात
त्या...चा एकही रिप्लाय
आला नाही, म्हणून
मी झोपण्यच्या तयारीत होते.
तेवढ्यात पुन्हा एक मेसेज
माझ्या इनबॉक्स मध्ये आला, लिहिले होते कीः "प्रेम हे
एका धनुष्याच्या बाणासारखा आहे.
तो बाण सरळ समोरील
व्यक्तीच्या ह्रदयाचा वेध
घेतो. हा बाण ह्रदयात
घुसताना काहीच वाटत नाही, पण काढताना मात्र अतोनात
यातना देऊन जातो."


  त्याचा मेसेज वाचुन कळले
की त्याला खुप दुःख झाले आहे.
पण
त्याला झालेल्या यातना मलाही झाल्याच
होत्या. म्हणुन मी लगेच
रिप्लाय केलाः "प्रत्येकाच्या जीवनातून
प्रेमाचा बाण एकदाच
धनुष्यातून
सुटतो,माझ्याकडुनसुध्दा सुटला.
पण तो निष्फळ ठरला.
एकदा सुटलेला बाण कधी पुन्हा येतो का?" त्यानंतर त्याचा कधी रिप्लाय
नाही आला आणि मी सुध्दा तसा प्रयत्न
कधी केला नाही. 



तात्पर्य:
प्रेमाच्या त्या बाणाला नेहमी ह्रदयात
जपुन ठेवा कारण
काढण्याचा प्रयत्न केला तर
मिळतात त्या फक्त यातना!!!!

Tuesday, March 13, 2012

घोंघावते वादळ

ती गाडी चालवत होती सोबत वडील
होते .....
रस्त्याने जात होते ...अचानक
वारा सुटला ......
आभाळ भरुन आले ... विजा कडाडू
लागल्या ...वार्‍याचा वेग वाढला ... घोंघावते वादळ सुरु झाले ...
ती घाबरली वडीलांना विचारले " गाडी थांबवू
का ? काय करु ? "
" चालवत रहा " वडील म्हणाले .....वार्‍या मुळे
गाडी हदरत होती ....
वादळाचा वेग वाढत होता ... " बाबा काय करायचे थांबायचे का ? "
तीने परत घाबरुन विचारले ..
" चालवत रहा , जाउ दे गाडी पुढे , थांबू नको "
वडील म्हणाले ........
पुढचे नीट काहीचं दिसत नव्हते ... फक्त
काही ती अंधून दिसात होते ... तितक्यात त्यांच्या पासून काही अंतरावर
तीला एक मोठी ट्रक
झाडाला धडकता दिसली ... ती अजून
घाबरली ......
" बाबा इतकी मोठी गाडी वादळात
पहा कधी झाली " " त्या कडे लक्ष नको देवू चालत रहा " वडील
म्हणाले
वादळाने फार वेग
घेतला होता ...ती गाडी चालवतचं होती ....
काही अंतर पुढेगेली आणि तीला जाणवले
वादळ जरा ओसरते आहे ... काही किलोमीटर पुढे गेल्यावर वादळ शमले
होते ......
पुढे जमीन अगदी कोरडी आणि आभाळ
अगदी स्वच्छ होते ......
" थांब आता आणि बाहेर निघ " तिचे वडील
म्हणाले ........ " पण आता का ?" तीने आश्चर्याने विचारले
" बाहेर निघ आणि जरा मागे पहा अजून बरेचं
लोकं त्या वादळात आहेत
तु त्या वादळातून बाहेर आली म्हणजे
सुटली असे नाही .. जा आता त्यांना मदत कर
तुला माहीत आहे आता त्या वादळातून कसे बाहेर पडायचे ते ...... वादळ आहे तीथेचं आहे" जीवनाच्या प्रवासात अशी वादळं
नेहमी येतात आणि जेव्हा आपण त्यात
सापडतो
तेव्हा जे नेहमी आपल्या सोबत असतात ,
आपल्याला धीर देतात ,
आपल्या पाठीवर हात ठेवून आपल्याला मार्ग दाखवतात ...........
ते आपले वडील , आई , आपले भाऊ बहिण ,
मित्र
नेहमी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे
असतात...
आपणास जगायचे कसे , संकाटाशी दोन हात कसे करायचे ते शिकवतात ...
मदत करायला शिकवतात....जगाय चे कसे ते
शिकवतात .....

Monday, March 12, 2012

एक परी आहे

एक परी आहे ओळखिची
आपल्याच चौकटीत राहणारी
पंख असून देखिल जमिनीवर चालणारी !

एक परी आहे ओळखिची
प्रेमाची भीती बाळगून ,
आपला मन मारत आयुष्य जगणारी

एक परी आहे ओळखिची
तिला वाटत प्रेम आहे बकवास
प्रेम म्हणजे आयुष्य खल्लास
पण कोण सांगेल तिला
प्रेम म्हणजे एक हवाहवासा सहवास

एक परी आहे ओळखिची
पळते आहे प्रेमा पासून लांब
पण तिला हे कळत नाही आहे
प्रेम हे तिच्या स्वत: मध्येच दडले आहे
कधी कोणी पलु शकतो का स्वत:पासून?

एक परी आहे ओळखिची
खुप आवडते मला ती
का समजत नाही तिला
प्रेम म्हणजे काय आहे!...

माझी आठवण कधीतरी येईल तुला

माझी आठवण कधीतरी येईल तुला
जुन्या आठवणीत मग तू शोधशील मला.....

कुणालातरी माझी आठवण सांगताना तू हसशील
पण त्या आठवणीत मला पाहताच तू रडशील.....

आठवेल तुला समुद्र किनारी आपल्या दोघांच फिरन
तुझ्या थरथरत्या स्पर्शात मी स्वता हरवून जान.....

तू माझा हातात हात घेउन अनेक स्वप्न सजवन
माझ्या डोळ्यात पाणी येताच मला हसवण.....

आठवेल तुला आपल्या प्रेमातला तो जुना पाउस
एकाच छत्रीत पाउसात भिजणारी ती आपली हाउस.....

ओल्या चिम्ब तुझ्या स्पर्शात अंगावर येणारे शहारे
काळ्या गर्द वातावरणात मोहरून गेलेले ते अंग सारे.....

माझी आठवण येताच मी जवळ असल्याच तुला भासेल
तुझ्या डोळ्यातून निघालेला अश्रुचा प्रतेक थेंब मी असेल.....

तू एकटी बसल्यावर आठवेल तुला प्रतेक क्षण
त्या क्षणांमधे दिसेल तुला माझ तडफडणार मन.....

माझी आठवण कधीतरी येईल तुला
व्याकुळ होउन तुझ मन शोधेल मला....

रंगपंचमीच्या खुप सार्‍या शुभेच्छा....!

Sunday, March 11, 2012

सखी सावली...


मी तिला आयुष्यभर शोधत राहिलो
भेटलीच नाही कधी मला
ती माझी सावलीच होती..

रखरखत्या उन्हात ती फक्त दिसायची
मी एकटाच असताना
ती जवळून चालायची..

काळ्याभोर अंधारात ती लपून रहायची
माझ्या जवळच कुठेतरी
नक्कीच बसलेली असायची..
-
मीही किती वेडा होतो सांगतो तुम्हाला
सावलीच माझी सखी
फार टोचून लागायचे..

हळूहळू त्याचीही मला सवय झाली होती
सखी सावली बरोबर
आता मी एकटा नव्हतो..

तिच्या गल्लीतून

मी उगीच कारणे काढतो
तिच्या गल्लीतून जायला
दिसेल ती एक क्षण
अन मी घायाळ व्हायला

मला आपले वाटते मला कोण पाहत नाही
मी तिला चोरून बघतो हे कोणाला कळत नाही
लोकांना पण संशय येतो, अनोळखी तरुण वारंवार का येतो
इथे त्याचे लफडे तर नाही ,चुकून ती मुलगी आपली तर नाही....

उगीच मग आपल्याच मुलीची कसून चौकशी चालू होते
काय गं! तुझ्या कॉलेज चा आहे का तो? विचारपूसपण होऊ लागते
तसे तिच्या होकार नकाराला काही अर्थ नसतो
पण आता विनाकारण गल्लीत फिरणे याला घरच्यांचा विरोध असतो

हळू हळू बातमी परिसरात पसरते
मग भाई लोकांची गर्दी जरा कान टवकारते
अरे आपल्या एरीयात कोण लाईन मारतो
आज साल्याची तंगडीच तोडतो
तो परत कधी येथे पाय ठेवायचा नाही
त्याला धडा शिकवल्याशिवाय आज राहायचे नाही

तोही जरा शहाणा आता एकटा फिरत नाही
चार मित्र सोबत असल्याशिवाय त्या गल्लीत घुसत नाही
विचारलेच कोणी तर सांगतो अरे मित्र राहतो माझा इथे
पण मला त्याचे घर काही सापडत नाही

इतके सगळे झाले तरी त्याला ती अजून सापडलेली नाही
पण आता सगळ्या गल्लीत त्याच्याच चर्चा होई

आणि गल्लीतल्या सगळ्या मुलींना वाटे
तो फक्त इथे माझ्याच साठी येई.....

Saturday, March 10, 2012

अशीच एक मुलगी..

साधारण शी सजणारी..
आणि हळुवार लाजणारी.. गोजिरी दिसणारी..
आणि खूप गोड हसणारी...
अशीच एक मुलगी..
काल स्वप्ना मधी दिसली..
आणि मला बघून हसली.. कोण जाने कशी माझ्या स्वप्नात घुसली..
आणि माझ्या हृदयात घर करून बसली.. गुलाब सारखे लाल ओठ..
सागरा सारखे डोळे..
तिचे केस..वेली सारखे लांब आणि नभा सारखे काळे
तिला मी बघितलं श्वेत फुलांच्या वनात.. अन पूर्ण साठवल
माझ्या मनात.. तिच्या पैंजणीचा आवाज आणखी पण तसाच कानात गुंजतो.. आणि सांगतो.आहे .मी तुझीच आहे.!!
मी तुझीच आहे..
पण कुणीतरी माझी चादर ओढली.. आणि माझी साखर झोप
मोडली.. परत कधी येशील ग प्रिये.स्वप्नात .. आता फक्त तूच
आहेस या वेड्या मनात..

काही माणसे

काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.
काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.
काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति
सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला
तर तुम्हाला मित्र मित्र करतात.
मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात.

Wednesday, March 7, 2012

होळी

होळी हा देशभर रंगांचा सण म्हणून ओळखला जात असला तरी महाराष्ट्रात त्याचे महत्त्व वेगळे आहे. ग्रामीण भागात शिमगा या नावाने ओळखला जाणार्‍या सणामागे एक आख्यायिका आहे.

पूर्वी राक्षसकुळात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. तो स्वत:ला श्रेष्ठ समजत असे. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा (नारायणाचा) परमभक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र विष्ण...ूच्या नावाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्येकवेळी तो अयशस्वी ठरला. अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली. होलिका हे तिचे नाव. ती राक्षसीप्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता. म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली. त्यावर होलिकेला बसविले. आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले. परंतु, प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिका जळून खाक झाली. आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह रूपाने हिरण्यकश्यपूचा वध केला.

थोडक्यात होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. त्यामुळे वाईट आचार-विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी हाच होळी साजरे करण्यामागचा उद्देश आहे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुख-समाधानाचे जाईल.

होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी त्यादिवशी होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

महाराष्ट्रात देखील होळी उत्सव आंनदाने, उत्साहाने साजरे करतात. आदल्या दिवसापासूनच होळी दहनासाठी लाकडे, झाडाच्या फांद्या जमविल्या जातात. काही ठिकाणी ही लाकडे चोरूनही आणली जातात. त्यावर रंगबिरंगी कपड्याचे तुकडे बांधले जातात. सर्वजण झाडाच्या त्या फांदीला कापडाचा एक तुकडा बांधतो. ती फांदी कपड्यांच्या तुकड्यांनी पूर्णपणे झाकली जाते, नंतर तिला सार्वजनिक ठिकाणी गाडले जाते. त्याच्यावर गवत, वाळलेली लाकडे, गवर्‍या, केळी, इतर फळे रचले जातात. मुहूर्तावर होळीचे पूजन करून मुख्यत: पुरणपोळीचा नैवैद्य दाखविला जातो. नंतर होळीचे दहन केले जाते. दहन करताना 'होळी रे होळी पुरणाची पोळी...' अशी घोषणाबाजी केली जाते.

Tuesday, March 6, 2012

आठवण

"आज तुझी मला खूप आठवण येतेय ......" आज तुझी मला खूप आठवण येतेय ...... भर पावसात एका छत्रीत काढलेली संध्याकाळ आठवतेय, चिंब पावसात भीजुन प्यालेली गरम चाय आठवतेय......अन आज तुझी मला खूप आठवण येतेय ...... तुझं ते कॉलेज सोडून जाणं आणी तुझ्यामुळे माझं सोडून देणं आता दोघांनाही सलतंय, घर ...आणी बार आता एकच दिसतंय, तुझ्या त्या अबोल प्रेमानेच हे घडतंय.. उगाच गेलीस दूर अशी मन माझं हरवतेय ...............अन आज तुझी मला खूप आठवण येतेय ...... आगळ - वेगळ असलं तरी प्रेम केलं तुझ्यावर ....., हेच बोलण्याच ओझं राहीलंं माझ्या मनावर..... आता माझ्या प्रेमाची सरीता नीरोप तुला देतेय ......अन आज तुझी मला खूप आठवण येतेय ......खूप आठवण येतेय ......

माहितीये मला

''माहितीये मला की तू आधीच कुनाची तरी झालीस म्हणून मी म्हणणार नाही कि तू माझी हो ...
 फक्त म्हणणे आता इवढंच की जशी होतीस तशीच राहा भासवु नकोस की
 "तू माझ्या आयुष्यातून गेलीस" माझा हट्ट नाही...
कि तुझे माझ्यावर प्रेम असूच दे...हट्ट आता इतकाच ..
.कि मनातील तुझे प्रतिबिंब तसेच राहू दे... माहितीये मला कि डोळे-तुझे, 
वाट-माझी कधीच पाहणार नाहीत पण... 
डोळे माझे वाट तुझी कधीच आयुष्यात चुकवनार नाही ..
 माहितीये मला कि माझ्यामुळे हास्य तुझ्या चेहऱ्यावर कधीच खुलणार नाही ... पण विसरू नकोस....
 कि मी ही आता आयुष्यभर हसणार नाही ... 
माहितीये मला कि तुझ्या हृदयावर आता दुसऱ्याच कोणाचा अधिकार आहे... 
पण माझ्या त्या गोड आठवणीतल्या 'तुझ्यावर' फक्त माझाच अधिकार आहे....!

Monday, March 5, 2012

ब्रेकअप

एका मुलाने
ब्रेकअपच्या वेळी केलेलं वक्तव्य..

माझं प्रेम तु जरी मान्य केल
नाही,
तरी मी तुझ्यासाठी जीव
... नाही देणार.. तुला दुसरा मुलगा जरूर मिळेल, पण ?????
माझ्या आईला पुन्हा मी मिळणार
नाही..

तो आणि ती..... एक लव स्टोरी …

दोघं एकाच शाळेत आणि मग एकाच कॉलेज मधे होते. इतक्या वर्षांची छान मैत्री होती दोघांची.
ती - दिसायला अतिशय सुंदर, सतत बोलणारी, सतत हसणारी, खूप हुषार.
... तो - अतिशय साधा, गप्प-गप्प राहणारा, अगदी चार-चौघांसारखा.


...
सतत बरोबर असायचे दोघं - अभ्यास, खेळ, सिनेमा, पिकनिक, टाइम-पास - काहीही असो - ना ती कधी त्याला बोलवायला विसरायची, ना तो कधी तिला सोडुन कुठे जायचा.. खरं म्हणजे ती त्याला हक्कानेच बोलवायची.. आणि त्याला तिला सोडुन कुठे एकटं जाणं शक्यच नव्हतं.."अरे! आज मला युनिव्हरसिटीत थोडं

काम आहे. येतोस का बरोबर?"

असा नुसता तिचा फोन आला.. आणि तो जेवण अर्धवट सोडुन तसाच बाईक घेऊन तिच्या घरी पोचला. त्याची आई म्हणतच राहिली त्याच्या पाठीमागे, "अरे, निदान जेवण तरी संपव..." पण त्याला कुठे भान होता...

बाईकवर ती नेहमी त्याच्याच मागे बसायची. आणि तो ही दुसऱ्या कुठल्या मैत्रिणीला मागे बसु द्यायचा नाही. ती दमली असेल तर त्याच्या खांद्यावर डोकं ठेवायची. तीचे केस वाऱ्यानी उडायचे, हलकेच त्याच्या गालवर

बसुन त्याला गुदगुली व्हायची.

लहानपणापासुनच दोघं एकत्र असल्याने दोघांचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं. तिचं एक स्वप्न होतं - तिला युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडल हवं होतं. त्या करता ती मेहनतही तशी घेत होती. तास
न तास अभ्यास करत होती. सोबतीला तो बसुन रहायचा. तिला झोप येऊ नये, तिचं concentration राहावं म्हणुन रात्री तिला तिची आवडती कॉफी करुन द्यायचा. तिचा वेळ नको वाया जायला म्हणुन तिच्या करता नोट्स, पेपर्स झेरॉक्स करुन आणायचा.

परीक्षा झाली. निकाल लागले. त्याला फर्स्ट क्लास मिळाला. त्याच्या करता तो खरं जास्तीच होता. आणि ती? तिचं स्वप्न पूर्ण झालं. तिला गोल्ड मेडल मिळालं..

त्या दिवशी संध्याकाळी ती भेटली त्याला.हातात एक लाल गुलाबाचं फुल होतं तिच्या.
तो प्रचंड खुष होता - फर्स्ट क्लास करता नाही, तर तिला गोल्ड मेडल मिळालं म्हणुन.

"आज मी खूप खुष आहे. एक गंमत झाली.
तुला विनय आठवतोय? दादाचा बेस्ट फ्रेंड? अमेरीकेला असतो गेले २ वर्ष.

परवाच आला तो १५ दिवसांकरता.
आज त्याला कळलं माझ्या रिझल्ट बद्दल. म्हणुन हे गुलाब घेऊन आला मला congratulate करायला. आणि त्यानी मला चक्क प्रपोज केलं!! म्हणजे पूर्वी तो इथे असताना माझा क्रश होताच त्याच्यावर. पण मला कधी वाटलं नव्हतं की आपलं त्याच्यावर प्रेम असलं तरी तो माझ्याकडे बघेल म्हणुन! मला म्हट्ला की अमेरीकेला मला पुढचं शिकता येईल.

आई-बाबांना सुद्धा तो पटला. त्यांनी पण लगेच हो सांगीतलं. येत्या रविवारी साखरपुडा आहे. त्याला लवकर परत जायचं आहे ना...म्हट्लं तुला येऊन आधी सांगते.

तुला पण कोणी आवडत असेल, तर तु मलाच पहिलं सांगशील ना?"
तो गप्प राहिला... नेहमी सारखा.. नुसतंच "हं" केलं..
              
 

                            तिचं लक्ष नव्हतंच नाहीतरी.. ती त्या गुलाबाकडेच बघत होती!!

तू सोडून गेल्यावर...

माझा श्वास थांबेल
एक थेंब अश्रु काढ
आणि एक दीर्घ श्वास घेउन टाक...
... माझ्यानंतर
माझी आठवण काढू नकोस..
माझा विचार मनातून काढून टाक..
माझ्या पत्रांना ..
जवळ ठेऊ नकोस...
त्रास होइल..
त्या आठवणीना जाळून टाक...
मी गेल्यानंतर...
माझी स्वप्न ही मरून जातील..
माझ्या स्वप्नाना...
माझ्या राखेसोबत नदीमध्ये वाहून टाक..
मी मेल्यावर...
कुणी विचारलं..
कोण होता तो...?
तर "एक वेडा" होता अस सांगुन टाक..
जिवलग मैत्रिण म्हणुन..
कुणी तुला विचारल..
आजार काय होता??
तर नजर झुकवुन "प्रेम" सांगुन टाक....

Friday, March 2, 2012

आता मी ठरवलय

आता मी ठरवलय एकदा असही करून पहायचं...
माणसांमध्ये जाऊन बसायचं, छान छान बोलायचं, खोटं खोटं हसायचं
... आणि अजून माणसात आहे असं दाखवायचं...

आता मी ठरवलय एकदा असही करून पहायचं...
त्या चंद्राशी गप्पा मारण्यापेक्षा मित्रांबरोबर कट्ट्यावर बसायचं
माझं सोडून त्यांचं रडगाणं ऐकायचं.. सूर कुठे जुळतात का ते पहायचं...

आता मी ठरवलय एकदा असही करून पहायचं...
मनात आभाळ दाटून आले की बाहेर पडणाऱ्या पावसात भिजायचं
मग ह्या शरीराबरोबर मनालाही गारवा मिळतो का ते पहायचं...

आता मी ठरवलय एकदा असही करून पहायचं...
हळवं बिळवं व्हायचं नाही..रुतलेल्या काट्यांना मलमपट्टी करायची..
दारू पेक्षा दवा काही काम करते का ते पहायचं...

आता मी ठरवलय एकदा असही करून पहायचं...
खोलीत जाऊन दार घट्ट बंद करून घ्यायचं..खिडक्या बंद करून पडदे ओढून मिट्ट अंधार करायचा..
पोटात पाय घेऊन मनसोक्त रडायचं आणि खरंच मन मोकळं होतं का ते पहायचं...

आता मी ठरवलय एकदा असही करून पहायचं...